हडपसर – महापालिकेच्या कोणत्याही प्रभागात शिवसेनेच्या नगरसेवकांची विकासकामे ही इतर नगरसेवकांच्या कामापेक्षा सरस असतात. असे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक २६ महमंदवाडी येथील जय भवानी चौकाचे सुशोभीकरण करून परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आज आढळराव पाटील यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख , नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, शहर उपप्रमुख समीर तुपे, राजेंद्र बाबर, तानाजी लोणकर, बाळासाहेब भानगिरे,अभिमन्यू भानगिरे,सचिन तरवडे आदिंसह शिवसेना पदाधिकारी ,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. नुकतीच बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे त्याबद्दल माजी खासदार आढळराव पाटील यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
पूर्वी नागरिक या ठिकाणी कचरा टाकत होते .त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.त्यामुळे परिसरातील सोसायटीमधील नागरिक या घाणीमुळे त्रस्त झाले होते .हे लक्षात येताच महापालिकेचया निधीची वाट न पहाता स्वखर्चाने चौकाचे सुशोभीकरण करून परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.