नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना त्या पदावर कायम पाहण्यास मतदार उत्सुक दिसतात. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून योगींना सर्वांधिक पसंतीची 41 टक्के मतं मिळाली. त्यांच्या खालोखाल सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना 31 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली.
बसपच्या प्रमुख मायावती यांना 15 टक्के मतदार मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितात. तर, कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रियंका गांधी यांना सुमारे 5 टक्के मतदारांनी कौल दिला. पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून चन्नी यांना सर्वांधिक पसंती (31 टक्के) मिळत आहे. पंजाबचे 21 टक्के मतदार आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितात. तर, शिरोमणी अकाली दलाच्या सुखबिरसिंग बादल यांना 16 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली.