संत निरंकारीच्यावतीने योग दिवस उत्साहात साजरा

नगर -मानवी जीवनात योगाला असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन योगाची व्यापक प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने देशभरात 400 ठिकाणी योग शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळाच्या नगर शाखेच्या वतीने निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात सकाळी 5.30 ते 7 या वेळेत सामुहिक योगा करण्यात आला. यामध्ये फाऊंडेशनचे सदस्य, निरंकारी सेवा दल व निरंकारी भक्तगण सहभागी झाले होते.

दीपा किरतानी व योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचा प्रारंभ निराकार ईश्‍वर व आध्यात्मिक सदगुरू प्रति प्रार्थनेने करण्यात आला. मानवी जीवन आध्यत्मिक, मानसिक व भौतिकदृष्ट्‌या समृद्ध करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून मानवमात्राला मार्गदर्शन केले जाते.

निरोगी व निरामय जीवन जगण्याची गुरुकिल्ली योग साधनेद्वारे तसेच प्राणायामाच्या सहय्याने लाभत असल्याचे लक्षात घेऊन निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाला व देशभरात 400 ठिकाणी योग शिबीरांचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या उत्साहानेअनुयायी व नागरिक सहभागी झाले होते.

येथील शिबीराच्या आयोजनामध्ये मंडळाचे अहमदनगर क्षेत्राचे प्रभारी हरिष खुबचंदानी, निरंकारी सेवादलचे क्षेत्रीय संचालक आनंद कृष्णानी, सेवादल शिक्षक अनिल टकले यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)