Shivangi Joshi: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे शिवांगी जोशी. या कार्यक्रमामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या शिवांगी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर शिवांगीने गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे.
शिवांगीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या हाताच्या बोटांमधील हिऱ्यांची अंगठी दाखविताना दिसत आहे. हा फोटो शेअर करीत तिने ‘मी हो म्हणाले’, अशी कॅप्शनही दिले आहे. या पोस्टवरून तिने सारखपुडा केला असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव केला आहे. तर काहींनी कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त केले. “एका मिनिटासाठी मला वाटले तू साखरपुडा केला,” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
View this post on Instagram
काय आहे फोटोमागचे सत्य?
शिवांगीच्या बोटातील ही अंगठी साखरपुड्याची नसून, एका दागिन्याच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी वापरण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या जाहिरातीसाठी ती ‘हो’ म्हटल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शिवांगीने ही पोस्ट संबंधित दागिन्यांच्या कंपनीला टॅगही केली आहे.
दरम्यान, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून शिवांगी जोशीला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत अभिनेत्री मोहसीन खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या शोदरम्यान सेटवर दोघांमधील जवळीक वाढू लागली. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, पण आता दोघेंचेही ब्रेकअप झाले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकांसह ती ‘लव्ह बाय चान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ या मालिकांमध्ये देखील झळकली आहे.