लंडन – दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैनिक आणि सर्वसामान्य ब्रिटिश नागरिक यांचे धैर्य वाढवण्याचे काम करणारा तत्कालीन पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल याच्या बनावट दातांचा नुकताच लंडनमध्ये लिलाव करण्यात आला असून त्या दातांना तब्येत 18000 पौंड रक्कम मिळाली आहे.
विन्स्टंट चर्चिल आपल्या वक्तृत्वासाठी आणि निर्णय क्षमतेसाठी प्रसिद्ध असले तरी अगदी तरुण वयात त्यांना दातांचा त्रास सुरू झाला होता वयाच्या तिशीपूर्वीच त्यांनी अनेक खोटे दात वापरायला सुरुवात केली होती आपल्या आयुष्यात तब्बल चार वेळा त्यांनी या बनावट दातांचा सेट बदलला होता वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी जो सेट वापरला होता.
त्याचाच लिलाव गेल्या आठवड्यात झाला आणि त्या दातांसाठी 18 हजार पौंड एवढी रक्कम मिळाली कोट्सवर्ड ऑप्शन कंपनीने हा लिलाव केला विक्रीसाठी चर्चिल यांचे 6 बनावट दात उपलब्ध होते लिलावाच्या कॅटलॉग वर या दातांना 8000 पौंड बेसिक किंमत देण्यात आली होती पण प्रत्यक्ष लिलावाच्या वेळी दुपटीपेक्षा जास्त किंमत मिळाली तसेच दुसरे महायुद्ध संपण्याची घोषणा चर्चिल यांनी ज्या मायक्रोफोनवरून केली होती त्या मायक्रोफोनची सुद्धा यावेळी लिलावात विक्री करण्यात आली ज्याला 11500 पौंड मिळाले.