लंडन – अंटार्टिका मधील हिमक्षेत्रात संशोधन करणाऱ्या ब्रिटनमधील काही संशोधकांना तेथे बर्फाच्या चादरीखाली दडलेली चार लाख वर्षे जुनी उल्का सापडली आहे. या शोधामुळे अंतरिक्ष संशोधक आणि शास्त्रज्ञ आनंदून गेले आहेत. एखाद्या महाकाय उलकेमुळे पृथ्वीच्या अस्तित्वाला कशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो याचा अभ्यास यामुळे शास्त्रज्ञांना करता येणार आहे.
अंटार्टिका मध्ये संशोधन करणार्या शास्त्रज्ञांना पूर्व भागामध्ये एका डोंगरावर ह्या ऊलकेचे तुकडे सापडले. सुमारे चार लाख तीस हजार वर्षांपूर्वी ही उल्का पृथ्वीवर आदळली असेल, तेव्हा तिचा आकार किमान शंभर मीटर असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर मॅथ वान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, ही उल्का जेव्हा अंटार्क्टिकावर आदळली असेल तेव्हा 2 हजार किलोमीटर क्षेत्र परिसरावर त्याचा परिणाम जाणवला असेल. सायन्स ऍडव्हान्स नावाच्या एका नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पृथ्वीवरील विविध भागात अशा प्रकारे पुरातन उल्का सापडल्या तर त्या काळात किती नुकसान झालेले असू शकते याचा अंदाज येऊ शकतो, असा दावा या नियतकालिकात करण्यात आला आहे. त्यामुळेच अंटार्टिका मध्ये सापडलेल्या या ऊलकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे.
आगामी काळात कोणतीही मोठी उल्का रहिवासी क्षेत्रावर कोसळण्याची शक्यता जरी कमी असली तरी अशी उल्का निर्जन भागामध्ये कोसळली तरी त्याचा परिणाम हजारो किलोमीटर लांब क्षेत्रावर होत असल्याने अंतिमतः नागरि क्षेत्रालाही त्याचा धोका जाणवतो.