यासिन मलिक यांना 22 एप्रिल पर्यंत कोठडी

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरातील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेला जेकेएलएफ संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याला येथील स्थानिक कोर्टाने 22 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्याच्याकडे पैशाच्या स्त्रोताबाबत चौकशी करायची असल्याने त्याला आमच्या कोठडीत पाठवावे अशी मागणी एनआयएच्यावतीने करण्यात आली होती ती न्यायालयाने मान्य केली आहे.

मलिक याला आज विशेष न्यायाधिश राकेश सयाल यांच्या कोर्टात सादर करण्यात आले. त्याच्या विरोधातील सुनावणी आज ईन कॅमेरा पद्धतीने झाली. याचिन मलिकला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्याने त्याच्या विरूद्धची तीस वर्षांपुर्वीचीही केस पुन्हा नव्याने सुरू करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.