विराट कोहली, स्मृती मानधना यांचा ‘विस्डन’कडून गौरव

नवी दिल्ली  – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधना यांना बुधवारी विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. तर, अफगाणिस्तानचा रशीद खान हा सलग दुसऱ्या वर्षी ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने अग्रस्थान पटकावले आहे. विराट बरोबरच टॅमी बेमाउंट, रोरी बर्न्स, जोस बटलर आणि सॅम करन यांचाही वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक पुरस्काराचे हे 156 वे वर्ष आहे. 1889 ला द अल्मनॅकने इंग्लंडच्या समर सिजनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आला होता. विराटसाठी गेले वर्ष स्वप्नवत होते. त्याने आयसीसीचे आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर, आयसीसी मेन्स टेस्ट प्लेयर ऑफ द इयर आणि आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळवले आहेत. विराट कोहलीची गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावरची कामगिरी विशेष मानली जात आहे. त्यामुळे कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 2735 गुणांची कमाई केली आहे.

इंग्लंडमध्येही कोहलीने चांगली कामगिरी केली होती. तेथे पाच कसोटी सामन्यांत त्याने 59.3 च्या सरासरीने 593 धावा केल्या होत्या. तर, महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मंधनाची कामगिरी देखील उल्लेखनीय झाली आहे. तिने 2018 मध्ये एकदिवसीय व ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 669 व 662 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला सुपर लीग ट्‌वेंटी-20 स्पर्धेत तीने 174.68 च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचाही समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.