वीसगाव खोरे, (वार्ताहर) – उत्रौली (ता.भोर) गावचे सुपुत्र यज्ञेश उदय कोठावळे यांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केली आहे. नीटच्या परीक्षेत ५५७ गुण मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तसेच जिजामाता विद्यालयात,माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. कोठावळे कुटुंबात १५ जण शिक्षकी पेशात कार्यरत आहेत.
एक नवीन वाट चोखळण्याकरीता आजोबा मुख्याध्यापक कै.सोनबा कोठावळे, आजी मुख्याध्यापिका रुक्मिणी कोठावळे यांच्या आशीर्वादाने वडील उदय कोठावळे, आई मुख्याध्यापिका शैला कोठावळे, चुलते शिक्षक अजय कोठावळे, चुलती नम्रता कोठावळे यांच्या प्रेरणेतून एमबीबीएस उत्तीर्ण होण्यास मदत झाल्याची यज्ञेश कोठावळे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, उपजिल्हाधिकारी राजश्री शिवतरे,तंटामुक्तीचे अध्यक्ष भरत शिवतरे, सेवा निवृत्त नायब तहसीलदार एकनाथ शिवतरे, सेवा निवृत्त शाखाधिकारी भरत लेकावळे,उपाध्यक्ष अशोक शिवतरे, माजी सरपंच भगवान शिवतरे, श्रीराम उद्योग समूहाचे संस्थापक रामचंद्र शेडगे, जगन्नाथ शेटे,माजी सरपंच नवनाथ शेटे, उपसरपंच संतोष शिवतरे, माजी उपसरपंच हनुमंत शिवतरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.