घे लिहून स्टँम्प पेपरवर

भरणेंच्या विजयासाठी स्टॅम्प पेपरवर लागली पैज

पुणे: इंदापूर तालुक्यातील प्रमुख पक्ष्याच्या नेत्यांनी अद्याप निवडणुकीचे फॉर्म अद्याप भरले नसले तरी मात्र सध्या एका पैजेची जोरदार चर्चा सुरुय सध्या गावा-गावात निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून यातूनच आपल्या नेत्यांवरील प्रेमापोटी पैज लावली असून हि पैज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये जो नेता जास्त मतांनी निवडून येईल त्याने विजयी झालेल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला तेवढीच रक्कम देण्याचे या पैंजेमध्ये ठरले आहे.

दत्ता भरणे यांचे समर्थक सोमनाथ बनसोडे तर हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक नितीन साबळे या दोघांमध्ये हि पैज लागलीये. यामध्ये या दोघांनी लेखी पत्रकावर स्टॅम्प (तिकीट) लावत लेखी दिले आहे. या मध्ये त्यांनी म्हटलंय की, र्षवर्धन पाटील विजयी झाल्यास सोमनाथ बनसोडे हे पराभूत उमेदवार जितक्या मतांनी पडला तितकी रक्कम स्वखुशीने नितीन साबळे यांना देतील. तसेच, जर दत्ता भरणे विजयी झाले तर, हर्षवर्धन पाटील जितक्या मतांनी पराभूत होतील तितकी रक्कम रोख स्वरुपात सोमनाथ बनसोडे यांना नितीन साबळेंकडून देण्यात येईल. या पैजेच्या रकमेची जबाबदारी आनंदनगर गावचे उपसरपंच रोहित मोहोळकर यांनी घेतली आहे. निकालानंतर 20 दिवसात संबंधित रक्कम विजयी उमेदवाराच्या समर्थकांना देण्यात येणार आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्या समर्थकांमधील या पैजेसाठी 5 साक्षीदारांनीही सह्या दिल्या आहेत. एका लेखी पत्रकारवर स्टॅम्प तिकीट लावून सरकारी दस्तावेज पद्धतीने ही पैज लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.