कोलकाता – बंगाल क्रिकेट संघटनेशी वाद झाल्यावर फारकत घेतलेला यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आता त्रिपुरा राज्य संघाचा मेंटॉर बनणार आहे. याबाबत त्याची त्रिपुरा क्रिकेट संघटनेशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.
भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या साहा याने बंगालच्या क्रिकेट संघटनेशी झालेल्या वादानंतर बंगाल संघाकडून रणजी तसेच अन्य प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास नकार दिला होता. संघटनेतील काही सदस्यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा त्याने खुलासा केला होता.
त्रिपुरा संघटनेतील सदस्यांशी चर्चा सुरू आहे ,मात्र संघटनेशी जोडला जाण्यासाठी त्याला बंगाल क्रिकेट संघटना तसेच बीसीसीआयकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.