DEL vs MUM Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात निर्धारीत 20 षटकात पाच गडी गमावून 171 धावा केल्या. ॲलिस कॅप्सीने सर्वाधिक 75 धावांची शानदार खेळी केली.
Innings Break!
The @DelhiCapitals post a challenging 🎯 of 172 for @mipaltan
Alice Capsey top-scores with 75(53) 🙌
Are we in for a high scoring thriller in the #TATAWPL Season opener? 🔥
Scorecard 💻📱 https://t.co/GYk8lnVpA8#MIvDC pic.twitter.com/dJiEgyykrD
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
संघाला पहिला धक्का शेफाली वर्माच्या रूपाने बसला. ती एक धाव काढून बाद झाली. या सामन्यात कॅप्टन लॅनिंगने 31 धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने 42 धावा आणि मारिझान कॅपने 16 धावा केल्या. ॲनाबेल सदरलँड एक धाव काढत नाबाद राहिली. मुंबईकडून नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय शबनिम इस्माईलला यश मिळाले.