नवी दिल्ली : काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या सुरू आहे. या यात्रेत आतापर्यंत सर्वच क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले आहेत. तर अनेक कलाकार देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. त्यातच आता दक्षिणेतील सुपर स्टार कमल हसन देखील भारत जोडो यात्रेत सगभागी झाले.
यात्रे दरम्यान कमल हसन यांनी, ‘ एकजूट भारतासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या दिशेनेकमल हसन झुकले आहेत, अशा दृष्टीने पाहू नये असे हसन यांनी सांगितले. पुढे म्हणाले, राजकारणाची समज असती तर १९७० मध्ये लागू करण्यात आलेल्या आणिबाणीच्या दरम्यान राजधानीच्या रस्त्यांवर उतरलो असतो.’
एवढंच नाही तर, यावेळी कमल हासन सर्वांनी विनंती करत म्हणाले, ‘माझ्या निर्णयाला कोणत्याही पक्षाच्या दिशेने झुकल्याचं पाउल समजू नका. एकजूट भारतासाठी मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. सध्या कमल हसन यांचे भारत जोडो यात्रेमधील राहूल गांधी यांच्यासोबत फोटो व्हायरल होत आहेत.
कमल हासन म्हणाले ‘ज्या लोकांनी माझ्यावर ६ दशकांपासून प्रेम केलं त्यांच्यासाठी आणि समाजासाठी काम करण्यासाठी मी राजकारणात पाऊल ठेवले आहे. कोणत्या गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडण्याआधी मला राजनीतीवर माझा प्रभाव पाडायचा होता. म्हणून राजकारणात प्रवेश केल्याचे कमल हासन यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेने जगभरात आपली छाप सोडली आहे. ७ सप्टेंबर २०२२ मध्ये तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा’ ३० जानेवारी २०२३ पर्यंत सुरु असणार आहे. ३० जानेवारी रोजी यात्रेची सांगता जम्मू-काश्मिर येथील श्रीनगर याठिकाणी होणार आहे. यावेळी राहूल गांधी राष्ट्रीय ध्वज फडकावत यात्रा समाप्त करणार आहेत.