पुणे -करोना बाधितांची संख्या गेल्या तीन-चार दिवसांत वाढत असून, बुधवारी ती दोनशे पार गेली, परंतु गुरुवारी ती तीनशेच्या जवळ गेली आहे. पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली असून, तिसऱ्या लाटेची तर ही सुरुवात नाही ना, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
बुधवारी 232 रुग्ण आढळले असून, गुरुवारी थेट 66 रुग्णांची वाढ झाली असून, ही संख्या 298 झाली आहे. बाधितांचा दर पाच टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दिवसभरात तीन बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोनजण पुणे हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत 5 लाख 9 हजार 806 बाधितांची नोंद झाली असून, 4 लाख 99 हजार 208 बाधित बरे झाले आहेत. तर 9 हजार 116 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 482 सक्रिय असून, त्यातील 89 बाधितांची प्रकृती गंभीर असून, 60 जणांना ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत. तर, 6 हजार 160 संशयितांची स्वॅब टेस्ट केली आहे.