नवी दिल्ली – सध्या जगभरात वेगाने पसरत असलेल्या करोनाच्या ओमायक्रोन या व्हेरिएंटचा प्रभाव पूर्वीच्या करोना व्हायरस पेक्षा कमी असल्याचं सांगितले जातं. त्याच बरोबर हा व्हेरिएंट संपुष्ठात येईल आणि आपण सगळे सामान्य जीवन पुन्हा जगू शकू असे भाकीतंही करण्यात आले. त्यामुळे उत्साह आहे. मात्र ओमायक्रॉन संदर्भात आता चिंताजनक बाब समोर आली असून
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपत्कालीन विभागातील वरिष्ठ अधिकारी कैथरीन स्मॉलवुड यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सध्याची परिस्थितीला पाहता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा परिणाम विपरीतही होऊ शकतो. हा व्हेरिएंट जसा पसरत जाईल तसा तो एका नव्या व्हेरिएंटला जन्म देऊ शकतो, असं स्मॉलवूड यांनी म्हटलं आहे.
सध्या जरी हा व्हेरिएंट डेल्टा पेक्षा कमी प्रभावी असला तरी यातून तयार होणारा नवीन व्हेरिएंट अधिक धोकादायक असेल, ज्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होईल. तसेचं ओमायक्रॉन व्हेरिएंट जंगलातील वणव्यासारखा पसरत आहे. त्यामुळे आपण आपली काळजी घेतली पहिजे, असंही स्मॉलवूड यांनी नमूद केलं.