पैसे वाचवण्यासाठी करते विविध उपायांचा अवलंब
लंडन : मोठ्या प्रमाणात परिश्रम करून चांगला पैसा मिळवल्यानंतर चैनीचे आणि आरामाचे आयुष्य जगावे अशी बहुतेकांची इच्छा असते पण प्रचंड पैसा मिळवून करोडपती झाल्यानंतरसुद्धा काटकसर करणाऱ्या एका महिलेची कथा सध्या व्हायरल होत आहे. एमी एलिझाबेथ असे या महिलेचे नाव असून ती 51 वर्षाची आहे.
एका वृत्तवाहिनीवर नुकतीच तिची मुलाखत प्रसारित झाल्यानंतर आणि आपण काटकसर करण्यासाठी काय काय करतो याची माहिती तिने दिल्यानंतर ती जगातील सर्वात कंजूस करोडपती महिला ठरली. 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेची मालकीण असलेली एलिजाबेथ महिन्याला फक्त 80 हजार रुपये खर्च करते. या सर्व खर्चाचे नियोजन ती महिना सुरू होताच करून ठेवते आणि ह्या नियोजनापेक्षा एक पैसाही ती जास्त खर्च करत नाही. तिच्या घरामध्ये नोकर चाकरही नाहीत ती आपल्या पतीच्या घरातच रहात असून पतीकडूनच ती सर्व घर कामे करून घेती.
काहीवेळा अन्नधान्याच्या खर्चात बचत व्हावी म्हणून घरातील मांजरांसाठी आणलेल्या अन्नाचा आहार म्हणून वापर करण्याचेही काम या कंजूस महिलेने केले आहे. विद्युत उपकरणांचा वापर ती कमीत कमी करते टीव्ही जास्त पहात नाही किंवा इतरही ठिकाणी विजेचा वापर जास्त होणार नाही यावर तिचा कटाक्ष असतो. रियल इस्टेट व्यवसायामध्ये काम करणारी एलिझाबेथ दरमहा मोठ्या प्रमाणावर कमाई करते.
पण तिला आता कंजूसपणे वागण्याची सवयत झाली आहे. त्यामुळे तिच्या संपत्तीमध्ये दर महिन्यात भर पडत असली तरी तिच्या खर्चामध्ये मात्र ती अजिबात वाढ करत नाही. उलट आपला खर्च कमीत कमी कसा असेल याचाच विचार ती सतत करत असते ब्रिटिश वाहिनीवर एलिझाबेथची मुलाखत प्रसारित झाल्यानंतर सध्या तिच्या कंजूषपणाची कथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.