ग्वाँझू : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी गटातील पहिल्याच लढतीत जापानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्कारावा लागला आहे.
Brilliant come back by @AKAne_GUcchi66 as @Pvsindhu1
goes down 21-18, 18-21, 8-21 in the first game in the group stage at the #BWFWorldTourFinals2019All the best for the next set of matches. #BestofBadminton#bamdinton pic.twitter.com/lYpf0hXBSZ
— BAI Media (@BAI_Media) December 11, 2019
‘अ’ गटात एकेरीच्या पहिल्या लढतीत जापानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा १८-२१, २१-१८, २१-८ असा पराभव केला. ही लढत १ तास अन् ८ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत यामागुची चौथ्या तर सिंधू सहाव्या स्थानी आहे.
आता २४ वर्षीय सिंधूला पुढील सामन्यात चीनच्या ‘चेन यु फेइ’ हिचे आव्हान असणार आहे. दरम्यान, सिंधूने चेनविरूध्द ९ पैकी ६ लढती जिंकल्या आहेत. मात्र चीनची चेन या वर्षी जबरदस्त फाॅर्मात असून तिने ६ अंतिम लढती जिंकत विजेतेपद पटकावले आहेत.