वाढदिवसाला खूप सेलिब्रेशन नको – रजनीकांत

मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांचा आज वाढदिवस आहे. रजनीकांत हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस म्हणजे तिथे एखादा उत्सव म्हणून साजरा केला होतो. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोखोंच्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग आहे.

दरम्यान, यंदा आपला वाढदिस साजरा न करण्याचे आवाहन रजनीकांत यांनी चाहत्यांना केले आहे. “मी माझ्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी माझा वाढदिवस जल्लोषात साजरा करू नये. त्याऐवजी, जे गरजवंत आहेत त्यांना कृपा करून मदत करा”. असं रजनीकांत यांनी दरबार चित्रपटाच्या ऑडिओ लाँचिंगच्यावेळी आपल्या चाहत्यांना म्हंटलं.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.