World Predictions : 2023 वर्ष संपत आहे आणि नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत जगभरातून मोठ्या उत्साहात करण्यासाठी सर्वजण तयारीला लागले आहे. त्यातच आता फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 2024 हे वर्ष जगासाठी कसे असेल याबद्दल अनेक भाकीत केले आहेत. त्याची माहिती जगासमोर आली आहे.
सोळाव्या शतकातील नॉस्ट्रॅडॅमस आजही त्याच्या भविष्यवाण्यांसाठी ओळखले जातात. 1555 मध्ये जगभरात घडणाऱ्या घटनांचे वर्णन करून लेस प्रोफेटीजमध्ये भविष्याविषयीचे त्यांचे भाकीत प्रकाशित झाले. या लेखांमधील अस्पष्ट तपशीलांमुळे, अनेक भविष्यवाण्यांचे मूल्यांकन करणे कठीण आहे. मात्र त्यातील आगामी 2024 ची भविष्यवाणी काय असेल हे सांगण्यात आले आहे.
2024 साठी नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी
2024 मध्ये जगाला नवा पोप मिळू शकतो, असे नॉस्ट्रॅडॅमस यांनी पोपविषयी भाकीत केले होते. सध्याचे पोप फ्रान्सिस म्हातारे आहेत, त्यामुळेच हे भाकीत अचूक वाटत आहे. याशिवाय नॉस्ट्राडेमसने हवामान आपत्तींबाबतही इशारा दिला आहे. 2024 बाबत त्यांनी इशारा दिला आहे की, यावर्षी अनेक ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय अत्यंत खराब हवामान आणि मोठ्या प्रमाणावर उपासमारीचा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान, सध्याची पावसाची आणि एकूणच वातावरणाची परिस्थिती पाहता हे भाकीत काही प्रमाणात योग्य वाटत आहे.
भूकंपाचा अंदाज
नॉस्ट्राडेमसने जपानच्या किनारपट्टीवरील शहरांबद्दल इशारा दिला होता की 2024 मध्ये भूकंप होईल, ज्यामुळेत्सुनामीचा धोका निर्माण होईल. याशिवाय त्यांनी धोकादायक विषाणू पसरण्याची शक्यताही वर्तवली आहे. कोविड-19 नंतर, जगाला कोणत्याही संसर्गाच्या बातमीची भीती वाटू लागली आहे. अशा स्थितीत नवीन वर्षात आणखी एक संसर्ग होण्याची शक्यता भीतीदायक आहे. 2024 मध्ये ब्रिटीश राजघराण्यात मोठे फेरबदल होऊ शकतात, असे नॉस्ट्राडेमस यांनी म्हटले होते.
मानवी आयुष्यमान वाढवण्याचा शोध लागेल
नॉस्ट्रॅडॅमसने भाकीत केले होते की, 2024 मध्ये वैज्ञानिक असा शोध लावतील ज्यामुळे मानवाचे आयुष्य 150 ते 170 वर्षे वाढेल. सध्या जगाचे आयुर्मान ७२ वर्षे आहे. नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली तर मानव दुप्पट जगू शकेल.
भविष्यवाणी कधी खरी ठरली?
नॉस्ट्रॅडॅमसच्या लेस प्रोफेसीज या पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती, जपानवर अणुबॉम्ब टाकणे, अॅडॉल्फ हिटलरचा उदय यासह अनेक भाकिते करण्यात आली होती, जी खरी ठरली आहेत. २०२३ सालाबद्दल त्यांनी आपल्या लेखात लिहिले होते, या वर्षी तिसऱ्या महायुद्धाचे दृश्य पाहायला मिळणार आहे.