Aamir Khan – ज्येष्ठ सिने अभिनेता आमिर खानने त्याच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बॉक्स ऑफिसवर सातत्याने वर्चस्व गाजवले. केवळ प्रेक्षकांना भुरळ घालणारेच नव्हे तर बॉक्स ऑफिसच्या चार्टवरही राज्य करणारे वैविध्यपूर्ण चित्रपट देण्यासाठी आमिर ओळखला जातो.
आमिर खानचा सिनेमॅटिक प्रवास अत्यंत उल्लेखनीय आहे. अशात तो नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असतो. नुकतेच आमिर खानने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपली आवड घेऊन एक नवीन प्रयत्न सुरू केला आहे. आमिर खान शास्त्रीय संगीत शिकत आहे.
रिपोर्टनुसार ,’आमिर दररोज एक तास त्याच्या गायनासाठी समर्पित करतो. तो गायनाचा सराव करत आहे आणि शास्त्रीय संगीत शिक्षकाकडून शिकत आहे.” गेल्या दोन वर्षांत, आमिरने त्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करून, त्याच्या आई आणि मुलांना वेळ देऊन अधिक आरामशीर दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्याने चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता.
यापूर्वी, आमिर खानला त्याच्या मुलीच्या लग्नाआधी मराठी शिकण्याची आवड निर्माण झाली होती. ‘गुलाम’ चित्रपटात राणी मुखर्जीसोबत ‘आती क्या खंडाला’मध्ये आपली जादू दाखवणारा आमिर खान सध्या गाण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहे. पण तो त्याच्या मुलीच्या लग्नातल्या खास परफॉर्मन्ससाठी आहे की त्याच्या आगामी कोणत्याही चित्रपटासाठी? हे स्पष्ट नाही. मात्र आता चाहते सोशल मीडियावर आमिरने गायलेल्या गाण्याची आतुरतेने वाट बघत आहे.