नवी दिल्ली – पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात खो-खो क्रीडा प्रकाराच्या विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राजस्थान खो-खो संघटनेने दिली आहे. भारतीय खो-खो महासंघानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
येथे सुरू असलेल्या वरिष्ठ पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेदरम्यान महासंघाने ही घोषणा केली आहे. करोनाच्या धोक्यामुळे अन्य सर्व खेळांप्रमाणे खो-खो स्पर्धेलाही फटका बसला होता.
आता राष्ट्रीय स्पर्धेच्या रूपाने स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेबाबत केंद्र शासनाशी यासंबंधी चर्चा झाली असून करोनामुळे स्पर्धेच्या आयोजनात अडथळा आला, तरी पुढील वर्षीच ही स्पर्धा होणार आहे.
बाडमेर हा जिल्हा कच्चे तेल आणि पेट्रोलच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. तेथील केर्न या तेल उत्पादन कंपनीने या स्पर्धेसाठी 2 कोटींची प्रायोजकता देण्याची घोषणा केली आहे.