World Cup Final : आयसीसी वनडे वर्ल्डकप (World Cup Final) सेमीफायनलमध्ये भारताने (Team India) न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आतापर्यंत अपराजीत राहिला आहे. आता भारताची लढत १९ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलचा महामुकाबला पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) स्वत: उपस्थित राहणार आहेत. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली असून, एक ट्विट देखील पोस्ट केले आहे.
Prime Minister Narendra Modi will attend the World Cup 2023 final. [Jagran News] pic.twitter.com/GX4C6YKcQi
— Johns. (@CricCrazyJohns) November 16, 2023
भारताने सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. हा सामना चांगलाच रंजकदार झाला. न्यूझीलंडनेही भारताला चांगली लढत दिली. त्यामुळे हा सामना अखेरच्या षटकांपर्यंत रंजकदार झाला.
विराट कोहलीने या सामन्यात आपले ५० वे वनडे शतक पूर्ण केले. विराटने यावेळी सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. त्यामुळे आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकांचा मान हा कोहलीला मिळाला आहे.