जागतिक कर्करोग दिन : कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो

भारतात दर वर्षी कर्करोगामुळे 7 लाख लोकांचा मृत्यू होतो. कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो आणि कर्करोगाचे निदान लवकर झाले तर त्यावर उपचार करता येऊ शकतात।

कर्करोग हे भारतातील मृत्यूंसाठी कारणीभूत असणारा एक प्रमुख घटक आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दर वर्षी कर्करोगाचे 11,57,294 रुग्ण नोंदले जाता, सुमारे 22.5 लाख रुग्ण या आजारासह जगत आहेत. त्याचप्रमाणे वर्ष018 मध्ये कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7,84,821 आहे.

यावर मात करण्यासाठी डॉक्‍टर तंबाखू वर्ज्य करण्याचा, व्यायाम करण्याचा, सकस आहार घेण्याचा आणि कर्करोगाची नियमित चाचणी करून घेण्याचा, कुटुंबाची कर्करोगाची पार्श्‍वभूमी लक्षात घेण्याचा आणि वेळेवर लस घेण्याचा सल्ला देतात.

कर्करोग झालेल्या रुग्णांची आकडेवारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, आतड्याचा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते आणि महिलांमध्ये स्तनांचा, ओठांचा किंवा तोंडाचा, गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा आणि जठराच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट आणि राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध व संशोधन संस्था यांनी वर्ष 2019 प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 0.81 टक्के पुरुषांना व 0.94 टक्के स्त्रियांना वयाची 75 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच कर्करोग होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे 7.34 टक्के पुरुष आणि 6.20 टक्के स्त्रिया या प्राणघातक आजारामुळे मृत्युमुखी पडू शकतात.
याशिवाय, गर्भाशयमुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग भारतात दर आठव्या मिनिटाला एका स्त्रीचा बळी घेत आहे, असे या अहवालातून दिसून येते.

त्याचप्रमाणे भारतात नव्याने स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या प्रत्येक 2 स्त्रियांपैकी एक स्त्री प्राण गमावू शकते. धक्कादायक बाब म्हणजे, तंबाखू सेवानामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दररोज 3,500 एवढी आहे. वर्ष 2018 मध्ये तंबाखूशी निगडित कारणांमुळे मृत्यू झालेल्या स्त्री-पुरुषांची संख्या 3,17,928 एवढी होती. ही आकडेवारी भयंकर आहे आणि म्हणूनच कर्करोगाला मुळातून खुडून टाकणे अत्यावश्‍यक आहे.

भारतात लाखो लोक फुप्फुसे, मुख, स्तन, जठर, गर्भाशयमुख, यकृत, प्रोस्टेट आणि रक्ताच्या कर्करोगाने ग्रासलेले आहेत. याशिवाय त्वचा, मूत्राशय आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रुग्णही आढळतात. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण भारतात खूप आहे.

आनुवंशिक बाबी, हार्मोन्सचा असमतोल, अनारोग्यकारक जीवनशैली, कमकुवत रोगप्रतिकार यंत्रणा, निदानास होणारा विलंब आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यांमुळे कर्करोगाच्या विविध प्रकारांना आमंत्रण मिळू शकते. या प्राणघातक आजाराबद्दल जागरूकता नसल्यामुळे हे घडून येते. कर्करोगावरील उपचार, लक्षणे, निदान व प्रतिबंध यांबाबत सर्वांना शिक्षण देणे; नियमित चाचण्या व तपासण्यांची माहिती देणे; मुलांच्या अभ्यासक्रमांमध्ये कर्करोगाच्या घातक परिणामांची माहिती समाविष्ट करणे; शिबिरे, अभियाने व उपक्रमांचे आयोजन करणे तसेच कर्करोगाबद्दलचे गैरसमज नाहीसे करणे ही काळाची गरज आहे.

कर्करोग, त्यावरील उपचार व त्याचा प्रतिबंध यांबद्दल जागरूकता निर्माण करणेही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. कर्करोगाचा प्रकार, त्याचे शरीरातील स्थान व तो त्याचा टप्पा या बाबींवर उपचार अवलंबून असतात. शस्त्रक्रिया तसेच किमोथेरपी, रेडिएशन आणि टार्गेटेड ड्रग उपचारपद्धती यांसारख्या अनेकविध उपचारपद्धतींच्या मदतीने रुग्णाची गाडी पुन्हा रुळावर आणता येते.

त्याचबरोबर तंबाखूचे सेवन कमी करणे, शारीरिकदृष्ट्‌या तंदुरुस्त राहणे (दर आठवड्याला 150 मिनिटे तीव्र स्वरूपाचे व्यायाम किंवा 75 मिनिटे व्हिगर वर्क आऊट), शरीराचे वजन नियंत्रणात राखणे, लसीकरण करून घेणे, मद्यपान मर्यादेत करणे आदी उपायांचा फायदा होऊ शकतो. कर्करोगाचे बहुतेक रुग्ण वयोवृद्ध असतात. त्यांना काही चयापचयविषयक आजार असतात. त्यामुळे त्यांच्या उपचारांवर, शारीरिक-मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत आणखी वाढते.

डॉ. निखिल फडके

 

Leave A Reply

Your email address will not be published.