ऑकलंड – आयसीसीने करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी होणारा पुरुष टी-20 विश्वकरंडक लांबणीवर टाकला आहे. पुढील वर्षी महिला विश्वकरंडक नियोजित आहे.
यजमान न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ग्रॅग बार्कले यांनी म्हटले की, पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्वकरंडक स्पर्धेविषयी पुढील दोन आठवड्यांत निर्णय घेण्यात येणार आहे. जर टुर्नामेंटला स्थगिती देण्याची गरज पडली तर याची माहिती आम्हाला अगोदरच समजण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी राखून ठेवण्यात आला असल्याचे बार्कले यांनी म्हटले आहे.
जर टुर्नामेंटचे आयोजन होणार असेल तर यावर अंतिम निर्णय घ्यावा लागेल. कारण पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टुर्नामेंटसाठी आम्हाला आतापासूनच जुळवाजुळव करावी लागणार आहे. आठ संघांची एकदिवसीय टुर्नामेंट न्यूझीलंडमध्ये 6 फेब्रुवारी ते 7 मार्च 2021 दरम्यान खेळली जाणार आहे. ही टुर्नामेंट ऑकलंड, हेमिल्टन, टॉरांगा, वेलिंग्टन, ख्राइस्टचर्च आणि डुनेडिन येथे खेळली जाणार आहे.