पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र, पक्षाचा उमेदवार नसल्यास इतर पक्षांचा प्रचार करण्याचे मनसेचे धोरण नसल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने आणि अश्विनी जगताप यांच्या प्रचारात मात्र मनसेचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते सहभागी होणार नसल्याचे मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघात 2012 च्या निवडणूकीत मनसेचे सर्वाधिक नगरसेवक या भागातूनच निवडून आले होते. त्यामुळे मनसेच्या पाठींब्याचा भाजपला फायदा होणार आहे.
कसबा आणि चिंचवड निवडणूकीबाबत पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी कोअर कमिटीची बैठक बोलविली होती. या बैठकीस मनसे नेते राजेंद्र वागसकर यांच्यासह अनिल शिदोरे, सरचिटणीस अजय शिंदे, किशोर शिंदे, बाळा शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मात्र, मनसे ही निवडणूक लढवत नसल्याने तसेच ज्या ठिकाणी पक्षाचा उमेदवार नाही त्या ठिकाणी पक्ष प्रचार करण्याचे धोरण नसल्याने शहर पदाधिकारी भाजपच्या बैठका, मेळावे, प्रचार सभा तसेच फेऱ्यांमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका मांडली.
Maharashtra politics : सत्यजीत तांबे लवकरच भाजपात प्रवेश करणार?
मात्र, ठाकरे यांनी त्याबाबत निर्णय घेतलेला नसून पुढील दोन दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात येणार असून ते प्रचारात सहभागी व्हायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे वागसकर यांनी स्पष्ट केले.