स्टार्ट अप्‌मध्ये महिलांचा सहभाग वाढणार

नवी दिल्ली – भारतात नव्या तंत्रज्ञानावर आधारित नवे उद्योग म्हणजे स्टार्ट अप्‌ वेग घेत आहेत. या क्षेत्रातील विकास सर्वसमावेशक व्हावा याकरिता महिलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अंतर्गत व्यापार आणि उद्योग प्रोत्साहन मंडळ म्हणजे डीपीआयआयटीने म्हटले आहे.

केंद्र सरकार स्टार्ट अप्‌ना सवलती देत आहे. या सवलतीचा फायदा 30 टक्के इतक्‍या महिलांना देण्यात येणार असल्याचे या विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सवलती महिलांच्या स्टार्टअप प्राधान्यक्रमाने दिल्या जातील. त्याचबरोबर बॅंका आणि इतर गुंतवणूकदारांना सरकार महिलांना मदत करण्याचा आग्रह करणार आहे. यासाठी एकूण स्टार्ट अप्‌पैकी एक तृतीयांश एवढी स्टार्ट अप महिलांचे असतील याची काळजी घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

महिलांचे स्टार्टअप आणि इतर महिला अभिमुख उद्योगांना केंद्र सरकारने एक हजार कोटी रुपयांची मदत करण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर उद्योग सुरू करून करू इच्छिणाऱ्या महिलांना कौशल्य वाढविण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन माहिती उपलब्ध करण्यात येणार आहे.

उद्योगासंबंधातील कायदे, कर आणि वित्तीय सल्ला या महिलांना उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतात स्टार्ट अप्‌ची संख्या वाढावी कारण यामुळेच नवे उद्योग सुरू होतात आणि रोजगार निर्मिती होते याची जाणीव सरकारला आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 18,213 स्टार्ट अपना मान्यता दिलेली आहे. त्यांना कमी अधिक प्रमाणात सरकारच्या सवलतीचा लाभ होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.