लोकसभा निवडणुकीत मतदारांना खात्री करून देता आली नाही – केजरीवाल

संग्रहित छायाचित्र....

नवी दिल्ली -आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला का मते द्यावीत हे आम्ही जनतेला सांगू शकलो नाही. त्यामुळेच या निवडणुकीत आमचा दणदणीत पराभव झाल्याचे आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून त्यात हरण्याबद्दलची दोन कारणे स्पष्ट केली आहेत.

दरम्यान, यापूर्वी केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत आपने देशातील सर्वात उत्तम प्रचार अभियान राबवल्याचे म्हटले होते. देशात मोदींची लाट होती. त्याचाच प्रभाव दिल्लीच्या राजकारणावरही पडला आणि भाजपला चांगले यश मिळाल्याचे दुसरे कारण केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत मोदीविरोधात राहुल असा सामना रंगला. त्याच धर्तीवर मतदारांनी मतदान केल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)