रेडा -इंदापूर शहरातील महिलांना महिला बचत गट व मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दिलेले कर्ज माफ करावे. यासाठी इंदापूर शहरातील शेकडो कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या शेकडो महिलांनी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
बुधवार (दि.23) सकाळी शेकडो महिलांनी एल्गार मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, कार्यकारिणी सदस्य काकासाहेब जाधव, नानासाहेब चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाचे राहुल शिंगाडे, संजय शिंदे, किरण गोफणे, सूरज धाईंजे, ऍड. किरण लोंढे, बाबासाहेब भोंग उपस्थित होते.
बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा ऍड. सुजाता चौदंते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मखरे यांनी सडकून टीका केली. यावेळी घरची हलाखीची परिस्थिती सांगताना अनेक महिलांना अश्रू आवरता आले नाहीत.