पुणे – टिळक रोड येथील अभिनव चौकात गॅस दरवाढीच्या विरोधात पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून गॅस दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला. ( gas cylinder price hike )
यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. तसेच चूलीवर स्वयंपाक करत गॅसदरवाढीचा निषेध केला.