- दिवसभरात एकाचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरामध्ये 108 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच 163 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत करोनाची बाधा झालेल्या नागरिकांची संख्या 1 लाख 940 इतकी झाली आहे.
शनिवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. त्यानुसार रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 108 जणांचा करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच उपचारादरम्यान चिंबळी येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत एकुण 2588 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1821 तर शहराबाहेरील 767 रुग्णांचा समावेश आहे.तर करोनावर मात केलेल्या 163 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 97 हजार 207 इतकी झाली आहे.
दिवसभरात 688 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. अद्याप 380 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 582 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1330 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1922 इतकी आहे.