नगर – स्वच्छ, सुंदर व हरित नगर करण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी सर्व महिलांनी पुढे येऊन वृक्षारोपणाचे कार्य सुरु करावे, असे प्रतिपादन नगरसेविका मीना चव्हाण यांनी केले.
प्रभाग क्रमांक एक मध्ये पुण्यश्लोकनगर, कसबे वस्ती येथे पुण्यश्लोक मंडळाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डी. आर. शेंडगे, स्वप्निल जतकर, प्रा. रोहिदास उल्हारे, प्रा. बाळासाहेब शेंडगे, रोहित पठारे, अनुराग उल्हारे, उषा शेंडगे, अश्विनी शेंडगे, मनिषा उल्हारे, कविता जतकर, ओंकार उल्हारे, राजवीर शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी शेंडगे म्हणाले, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे.