मुंबई – नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्याविना भारताचा कसोटी संघ गुरुवारी पहाटे इंग्लंडला रवाना झाला. माजी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंचे फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केले मात्र, रोहित कुठे आहे, असा प्रश्नही चाहते विचारत असून यावर अद्याप बीसीसीआयने खुलासा केलेला नाही. एकमेव कसोटी भारतीय संघाने जिंकली तर इंग्लंडमध्ये 2007 सालानंतर कसोटी मालिकाही जिंकता येणार आहे.
England bound ✈️
📸 📸: Snapshots as #TeamIndia takes off for England. 👍 👍 pic.twitter.com/Emgehz2hzm
— BCCI (@BCCI) June 16, 2022
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या फोटोत कोहलीसह महंमद सिराज, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, शुभमन गिल, प्रसिद्ध कृष्णा व केएस भरत यांचा समावेश आहे. रोहितसह उपकर्णधार लोकेश राहुलही या फोटोत नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राहूलला दुखापत जाली असून तो अद्याप तंदुरुस्त ठरलेला नसल्याने संघासह तो रवाना झालेला नाही. मात्र, रोहित संघाला कधी जाऊन कधी मिळेल, असाही सवाल केला जात आहे.
भारतीय संघ ग्लिंडला एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली होती, मात्र त्यावेळी करोनाचा धोका वाढल्याने पाचवा व अखेरचा कसोटी सामना स्थगित केला गेला होता. तोच सामना आता खेळवला जाणार आहे.