मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले.
तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. राज ठाकरेंच्या या भाषांतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे नाशिकमध्ये मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह इतर मुस्लिम नगरसेवक राज ठाकरे यांची उद्या मुंबईत भेट घेणार आहेत.
मशिदींवर भोंगे लावलेच नसते, तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. मशिदींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही नगरसेवक सलीम शेख यांनी केले आहे.