मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘प्रिया बापट’ने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे. प्रिया सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रीय असते.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, या फोटोतून प्रियाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. अभिनेत्री आपल्या या बोल्ड अँड बिनधास्त लुकने सर्वांनाच घायाळ करत आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियाने निळ्या रंगाचा डेनिम घातलेला आहे. तिचे हे आउटफिट नेहमी पेक्षा जरा हटके आहे. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने शर्टचे बट्न्स काढत बोल्ड पोजसुद्धा दिल्या आहेत.