मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे.वर्धापन दिनानिमित्त आज राज ठाकरे ठाण्यातील गडकरी रंगायथन येथे सभा घेणार आहेत. सध्याचे राज्यातील वातावरण आणि मनसेची पुढील वाटचाल याबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यासाठी मनसेने कार्यकर्त्यांना सज्ज होण्यासाठी एक आवाहन देखील केले आहे.
नव्या दमाने, नव्या आयुधांसह… #मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/Aj1XrQzooe
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 8, 2023
नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज !अशा आशयाचे ट्विट मनसेच्या अधिकृत ट्विटवरून करण्यात आले आहे. तसेच राज ठाकरेंच्या सभेपूर्वी एक टीजर देखील जारी करण्यात आला आहे. या टीजरमध्ये ठाकरेंच्या विविध सभांमधील झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे यात मनसेसाठी बनवण्यात आलेलं नवीन गाणं देखील ऐकायला मिळत आहे.
नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज ! #मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/gMwIEfwoAF
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 7, 2023
नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज ! हे ब्रीदवाक्य मनसेला कितपद उभारी देणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.त्यात उद्धव ठाकरेंना पक्षनाव आणि चिन्ह गमवावे लागले. मनसेच्या भोंग्याच्या आंदोलनानंतर पुढील वाटचालीची दिशा कशी असेल याबाबत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या राज्यचं लक्ष लागून आहे.