नवी दिल्ली -भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार कपिल देव व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विस्डेनने खास सन्मान केला आहे.
कोहलीला 2010 ते 2020 या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड केली आहे. सचिनला 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर कपिल देव यांचा 80 दशकातील
सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना 50 वर्षे पूर्ण झाल्याने दशकातील पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. 1971 ते 2021 या कालावधीतील पाच क्रिकेटपटूंना हा मान देण्यात आला आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली असून, ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले आहे. वेस्ट इंडीजच्या कॅरन पोलार्डचा सर्वोत्कृष्ट टी-20 क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे.