विराट कोहलीचा सीमारेषेबाहेर थयथयाट

चेन्नई  -रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने बाद झाल्यानंतर प्रचंड थयथयाट केला. बाद होऊन परतत असताना त्याने सीमारेषेच्या बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बॅट आपटून आपला संताप व्यक्‍त केला. रागाच्या भरात त्याने आपल्या बॅटने खुर्ची तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच आपली बॅटही फेकून दिली. कोहलीच्या या वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सनरायझर्स हैदाराबादविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली 33 धावांवर बाद झाला. यापूर्वी मुंबई इंडियन्सबरोबर झालेल्या सामन्यातही कोहलीला 33 धावाच करता आल्या होत्या. या सामन्यातही तेवढ्याच धावा करता आल्याने कोहली चांगलाच संतापला होता.

बाद झाल्यावर मैदानातून पॅव्हेलियनमध्ये जात असताना कोहलीने आपला राग मैदानात काढल्याचे पाहायला मिळाले. कोहलीला जेसन होल्डरने बाद केले. कोहलीने चार चौकारांच्या जोरावर 33 धावा केल्या.

बाद झाल्यावर विराट सीमारेषेजवळ पोहोचला. पहिल्यांदा कोहलीने सीमारेषेवर आपली बॅट आपटली. त्यानंतर तिथेच खेळाडू डगआऊटमध्ये बसले होते. त्यावेळी डगआऊटमध्ये एक खुर्ची रिकामी होती. कोहलीने त्या खुर्चीवर बॅट आपटली आणि ती तोडण्याचा प्रयत्न केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.