अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कार्तिक हा काही दिवसांपासून त्याच्या आगामी “धमाका’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या राइट्समुळे त्याला प्रसिद्धी मिळत आहे.
“धमाका’ चित्रपटाचे राइट्स नेटफ्लिक्सने तब्बल 135 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. हा चित्रपट कार्तिकच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट कार्तिकसाठी धमाकेदार ठरत आहे. यामुळेच कार्तिकच्या चाहत्यांनाही चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे नेटफ्लिक्सकडून आतापर्यंतची ही सर्वांत मोठी डील ठरली आहे. यापूर्वी अक्षयकुमारच्या “लक्ष्मी’ आणि अजय देवगणच्या “भुज ः द प्राइड ऑफ इंडिया’साठी 100 कोटी रुपये मोजण्यात आले होते.
दरम्यान, 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या “द टेरर लाइव’ या साउथ कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी करत आहे.