पुणे – उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडाही गारठला आहे. शनिवारी राज्यातील विविध भागातील तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.
राज्यात सर्वांत कमी तापमान 7.8 अंश सेल्सिअस नाशिक येथे नोंदवले गेले आहे. पुण्यातही किमान तापमान 9.6 अंश सेल्सियस नोंदवले गेले. किमान तापमानाचा पारा 10 अंशापेक्षा खाली आला आणि सरासरीच्या तुलनेत तापमानात 4.5 अंशांची घट झाली असेल, तर राज्यात थंडीची लाट आली असे समजले जाते.