लंडन :- सर्बियाचा 23 ग्रॅंडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा पाचवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांनी संघर्षपूर्ण विजयांसह विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात आगेकूच केली.
महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवा व व्हिक्टोरिया अझरेन्का यांनी विजय नोंदवले. दुसऱ्या मानांकित जोकोविचला विजयासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनवर 6-3, 7-6 (7-4), 7-5 अशी मात केली.
अन्य चुरशीच्या सामन्यात त्सित्सिपासने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमवर 3-6, 7-6 (7-1), 6-2, 6-7 (5-7), 7-6 (10-8) असा विजय मिळवला. इटलीच्या लोरेंझो मुसेट्टीने स्पेनच्या क्वामे मुनारला 6-4, 6-3, 6-1 असे नमवले.
चौथ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला ब्रिटनच्या लियाम ब्रॉडीकडून 6-4, 3-6, 4-6, 6-3, 6-0 अशा पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत क्विटोवाने जॅस्मिन पाओलिनीवर 6-4, 6-7 (5-7), 6-1 असा विजय मिळवला.
अझरेन्काने नादिया पोडोरोस्काला 6-3, 6-0 असे पराभूत केले. 350 जोकोविचचा हा 350वा ग्रॅंडस्लॅम विजय ठरला. अशी कामगिरी करणारा तो रॉजर फेडररनंतरचा (369) केवळ दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला आहे.