लंडन :- ग्रॅंड्स्लॅम टेनिस स्पर्धतील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धत बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने आपली आगेकूच कायम राखली आहे. तिने उपउपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या एक्तेरीना अलेक्झांड्रोव्हावर 6-4, 6-0 असा विजय मिळवला व उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.
महिला एकेरीच्या अन्य लढतींत ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरने चक प्रजासत्ताकच्या पट्रा क्विटोव्हावर 6-0, 6-3 अशी मात केली. अमरिकेच्या मडीसन केएसने रशियाच्या मायराचा 3-6, 7-6, 6-2 असा पराभव केला.
कझाकिस्तानच्या एलिना रायबाकिनानही आगेकूच कायम राखताना ब्राझीलच्या बीट्रीज मायाविरुद्ध थाटात सुरुवात केली होती मात्र, माययाने दुखापतीने सामना सोडला व रायबाकिनाला पुढे चाल मिळाली.
पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कराझने मारियो बरट्टिनीवर 3-6, 6-3, 6-3, 6-3 अशी मात केली. पहिला सेट गमावल्यावरही अल्कराझने सामन्यात थाटात पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकत सामनाही खिशात घातला.
डेन्मार्कच्या होल्डर रुनाने सनसनाटी निकाल नोंदवताना बल्गेरियाच्या स्टार खेळाडू ग्रिगोर दीमित्रोववर 3-6, 7-6, 7-6, 6-3 अशी मात केली.