Jayant Patil on join bjp- राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुका पाहता भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. अशात जयंत पाटील यांच्याबाबत सुरु असणाऱ्या चर्चांबाबत त्यांनी स्वतः भाष्य केले आहे. त्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“बऱ्याच लोकांची रोज चर्चा असते. 100 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडेचे लोकं त्यांना हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे, “असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या माध्यमांशी बोलत होत्या. | Jayant Patil on join bjp-
राष्ट्रवादी पक्षात दोन गट झाल्यानंतर पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरु झाला असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अशात जयंत पाटील हे देखील पवारांची साथ सोडून भाजपचं कमळ हातामध्ये घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.त्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी स्वतः या सर्व बाबी फेटाळून लावलाय आहेत.
कोणी कुठे येणार नाही आणि जाणार नाही असं स्पष्ट मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.तसेच माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलंच आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येतं. आपण यावर नंतर बोलू असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्टपणे म्हंटले. | Jayant Patil on join bjp-