दिवाळीच्या निमित्ताने चला हवा येऊ दया च्या कलाकारांना संधी मिळालेली आहे, एका भव्य फार्महाऊस वर रहाण्याची आणि मजा करण्याची .. पण ही जागा आहे एका जुन्या राजाची ज्याच नाव आहे महाराजा प्रदीप सिंग उर्फ बच्चू जोशी यांची जे 500 वर्षांपूर्वी च गेलेले आहेत .. आणि त्यांच्या एका अत्यंत प्रिय वस्तुशी हे थुक्रट वाडीचे लोक छेडछाड करतात आणि राजा चां आत्मा अवतरतो .. आणि या सगळ्यांना बंदी बनवून राजाला हसवण्याची शिक्षा देतो .. त्यातला राजा आहे ‘स्वप्नील जोशी’.
जो आता प्रत्येक भागात समोरच्या सिंहासनावर बसून यांच्या कॉमेडीचा आनंद घेईल .. आणि दिलखुलास मजा करताना दिसेल.
‘चला हवा येवू द्या’ या कार्यक्रमाने गेली सहा वर्षे मराठी नाटक , मराठी सिनेमा , मराठी कलाकार याना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं आहे . स्वप्निल जोशी या कार्यक्रमात अनेकदा पाहुणे म्हणून आलेले आहेत … ते आले की थुकरटवाडीत माहोल असतो.पण हाच माहोल कायम राहिला तर ?
थुकरट वाडी च्या या हटके कलावंतांबरोबर नेहमीचं हास्याची दिवाळी साजरी करण्यासाठी आता स्वप्निल जोशी ही सज्ज झाले आहेत .
आणि या टीम ला प्रोत्साहित करत पुन्हा हास्याचा धमाका करण्याची त्यांची इच्छा दिवाळीच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.