नवी दिल्ली – दोन लघूग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असून ऐन दिवाळीत पृथ्वीवर आदळण्याची भीती आहे. त्यातील एक लघूग्रह ताजमहालच्या दुप्पट आकाराचा आहे. 2020 टीबी9 आणि 2020 एसटी1 अशी त्या लघूग्रहांची नावे आहेत.
2020 एसटी 1 हा अधिक घातक असल्याचे सांगून तो उद्या (दि. 14) पृथ्वीच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे, असा इशारा नासाने आज दिला. 175 मिटरचा हा लघूग्रह पृथ्वीच्या कक्षेत 28 हजार 646 किमी वेगाने आदळण्याची शक्यता आहे, असे नासाच्या पृथ्वीजवळील घटकांचा अभ्यास करणाऱ्या केंद्राने म्हटले आहे.
2020 टीबी 9 हा उपग्रह 30 मिटरचा आह. त्याच्या छायाचित्रात तो सामान्य विमानानच्या आकाराचा दिसत आहे. त्याचा वेग 21 हजार 600 किमी आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 2019 व्हीएल 5 हा उपग्रहही पृथ्वीच्या कक्षेतून 15 नोव्हेंबरला जाण्याची शक्यता आहे, असे त्यात म्हटले आहे.