मुंबई – मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्नील शुटींग संपवून मुंबईत विमानतळावर पोहचल्यानंतर त्याच्या मुलांनी त्याचे आनंदात स्वागत केले आहे. या चिमुकल्यांनी केलेल्या स्वागताने स्वप्नील देखील भारावून गेला होता. हा व्हिडिओ शेअर करत स्वप्नीलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वप्नील जोशीने त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्वप्नील मुंबई एअरपोर्टवर पाऊल ठेवताच त्याची दोन्ही मुलं मायरा आणि राघव धावत आली आणि त्यांनी स्वप्नीलला मिठी मारली. यावेळी दोन्ही मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले खास वेलकम ग्रिटींग कार्ड स्वप्नीलला देताना दिसतात. त्यानंतर दोघेही आनंदाने उड्या मारत नाचू लागतात. हा व्हिडीओ शेअर करत स्वप्नीलने लिहीलं की, “Been there done that…there is no place like “being loved” !!! मायदेशी परत आल्यावर असं स्वागत व्हायला भाग्य लागतं.”
View this post on Instagram
दरम्यान, स्वप्नील जोशी परदेशात सध्या इंद्रधनुष्य सिनेमाचं शुटींग करत आहे. या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग सुरू असून चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव हे करत आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.