Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तरुण वर्गात तो अधिक लोकप्रिय आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेकदा शूटिंगमध्ये तो व्यस्त असल्याचे दिसते. मात्र कामासोबतच तो कुटुंबाला देखील वेळ देताना दिसतो. सध्या स्वप्नील जोशी कुटुंबासोबत दुबईला गेला आहे. येथील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्वप्नील पत्नी आणि मुलांसोबत दुबईला गेल्याचे त्याने शेअर केलेल्या फोटोतून दिसत आहे. यावेळी स्वप्नीलची मायरा आणि राघव ही दोन्ही मूलं आनंदी असल्याचे दिसत आहे. दोघेही तिथल्या वाळूत खेळताना दिसत आहेत. तर त्याच्या मुलाने आणि पत्नीने हातावर गिधाड घेतल्याचे दिसते. ते एका गाडीतून वाळूवर फिरतानाही दिसत आहेत. हे फोटो शेअर करत स्वप्नीलने लिहिलं, ‘जोशी, कम टू दुबई!’ सध्या या फोटोवर चाहत्यांच्या लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
दुबईमध्ये कुटूंबासोबत एन्जॉय करत असल्याचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वप्नीलने मायरा आणि राघवचा एक व्हिडिओ शेअर केला होता. शुटींग संपवून मुंबईत विमानतळावर पोहचल्यानंतर त्याच्या मुलांनी त्याचे आनंदात स्वागत केल्याचा तो व्हिडिओ होता. या चिमुकल्यांनी केलेल्या स्वागताने स्वप्नील देखील भारावून गेला होता.
या व्हिडीओत स्वप्नील मुंबई एअरपोर्टवर पाऊल ठेवताच त्याची दोन्ही मुलं मायरा आणि राघव धावत आली आणि त्यांनी स्वप्नीलला मिठी मारली. यावेळी दोन्ही मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले खास वेलकम ग्रिटींग कार्ड स्वप्नीलला देताना दिसली होती.