Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक ओळखली जाते. नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिची नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा रंगली. सध्या संमथा म्युकर मायकोसिस आजारातून सावरत असून यासाठी तिने अभिनयापासून काही काळ ब्रेक घेतला आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतेच तिला दुसऱ्या लग्नाबाबत विचारण्यात आले होते. त्यावर तिने उत्तरही दिले आहे.
रविवारी समांथाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि तिने त्याची मजेशीर उत्तरं दिली. त्यातच एका इन्स्टाग्राम यूजरने तिला ‘तू पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहेस का?’ असं विचारलं. यावर समांथाने “आकडेवारी पाहता ही एक वाईट गुंतवणूक आहे”, असे उत्तर दिले. तिने सोबत घटस्फोटाची आकडेवारी शेअर केली आहे. या आकडेवारीमध्ये पहिल्या लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण 50 टक्के, दुसऱ्या लग्नात 67 टक्के आणि तिसऱ्या लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण 73 टक्के असल्याचं लिहिलं आहे.
दरम्यान, समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. समंथा आणि नागा यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. 2021 मध्ये दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले. रिपोर्टनुसार, नागा आता अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.