Most Searched Word in 2023 : 2023 या वर्षाच्या आता संपण्याच्या उंबरठ्यावर आपण आलो आहोत. या वर्षात अनेक गोष्टी घडल्या ज्या सोशल मीडियावर हायलाइट झाल्या. अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शोधल्या गेल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमेरिकेतील प्रतिष्ठित मासिक ‘टाईम’ने जगातील सर्वाधिक सर्च केलेल्या शब्दांची यादी जाहीर केली.
टाईम मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये सर्वाधिक शोधले जाणारे शब्द सांगितले. यावर्षी ‘इंडिया’चे नाव बदलून भारत करण्यात येणार असल्याची एक मोठी बातमी आली होती. कदाचित याच कारणामुळे 2023 मध्ये ‘भारत’ हा शब्द भारतात सर्वाधिक शोधला गेला. इतर देशांमध्ये कोणते शब्द सर्वात जास्त शोधले गेले जाणून घेऊ यात
भारतात सर्वाधिक सर्च केलेला ‘भारत’
अमेरिकेच्या प्रसिद्ध टाईम मॅगझिनने या वर्षी जगातील विविध देशांमध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दांची यादी जाहीर केली आहे. या वर्षी भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेला शब्द ‘भारत’ होता. यावर्षी भारतात G20 परिषद झाली. संपूर्ण जगाचे लक्ष या परिषदेकडे लागले होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलासमोरील भारत लिहिलेल्या फलकाकडे सर्वाधिक लक्ष लागले होते. अशा जागतिक व्यासपीठावर ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. ‘भारत’ हा शब्द भारतात सर्वात जास्त शोधला जाण्याचे हे मुख्य कारण होते.
ऑस्ट्रेलियात हा शब्द सर्च केला गेला
2023 साली ऑस्ट्रेलियात एक अनोखा शब्द सर्च करण्यात आला. ऑस्ट्रेलियात यावर्षी सर्वात लोकप्रिय शब्द ‘पासवर्ड चाइल्ड’ होता. या शब्दाची उत्पत्ती कोठून झाली हे जाणून घेऊया. खरं तर, पालक आपल्या सर्व मुलांवर प्रेम करतात. पण काही मुले अशी असतात ज्यांच्या नावाने ते पासवर्ड तयार करतात. यावरून पासवर्ड चाईल्ड हे संकल्पना समोर आली आणि ती सर्वाधिक सर्च करण्यात आली.
इतर देशांमध्ये हे शब्द शोधले गेले
तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगात झपाट्याने स्थान मिळवणाऱ्या जपानमध्ये ‘जी’ हा शब्द यावर्षी सर्वाधिक सर्च केला गेला. या शब्दाचा अर्थ कर असा होतो. वास्तविक, जपान सरकार आपल्या देशातील नागरिकांवर कराचा बोजा वाढवण्याचा विचार करत आहे. यावेळी जपान आपले संरक्षण बजेट 113 ट्रिलियन डॉलरने वाढवणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून अधिक कर वसूल केला जाईल, अशी चर्चा रंगली होती त्यानुसार इथल्या नागरिकांनी हा शब्द जास्त सर्च केला असल्याचे म्हटले जात आहे.
‘माउंटन रोडमंकी’ हा शब्द यावर्षी तैवानमध्ये सगळ्यात जास्त सर्च करण्यात आला. हा शब्द देशातील वाहन चालकांसाठी वापरला जातो. जे वळणदार रस्त्यांना रेसट्रॅकसारखे वागवतात. पण हा शब्द तैवानमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. वास्तविक, रोडमंकी हे तैवानमधील एका छोट्या कथेतील नामाचे पात्र आहे. ज्याच्याशी प्रेमात विश्वासघात होतो आणि तो मरतो.
अमेरिकेत ‘स्पाय बलून’ हा शब्द शोधला गेला तर उर्वरित जगात ‘नास्तिक’ हा शब्द शोधला गेला. अमेरिकेत या वर्षी ‘स्पाय बलून’ हा शब्द सर्वाधिक सर्च केला गेला. खरं तर, यावर्षी अमेरिकेत आकाशात फुगे उडताना पाहून अमेरिकेने चीनवर हेरगिरीचा आरोप केला. यामुळे हा शब्द सर्वाधिक शोधला गेला. ‘द नन्स वर्ड’ हा उर्वरित जगात सर्वाधिक शोधला जाणारा शब्द होता. म्हणजे नास्तिक. युरोपात नास्तिकता झपाट्याने वाढत आहे.