Gashmir Mahajani : अभिनेता गश्मीर महाजनी याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देऊळ बंद’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. मराठी चित्रपटांसह त्याने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असल्याचे दिसते. मागील वर्षी त्याचे वडील रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. त्यांच्यावर आधारित बायोपिकबाबत एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. त्यावर गश्मीरने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
गश्मीरने इन्स्टाग्रामवर askgashmeer सेशनही घेतले. या सेशनमध्ये गश्मीर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. यात त्याला एका चाहत्याने गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांच्याबद्दल प्रश्न विचारला. “रवींद्र महाजनींवर बायोपिक आला तर त्यात तुम्ही त्यांची भूमिका साकारणार का?” असा प्रश्न चाहत्याला गश्मीरने विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचं गश्मीरने उत्तर दिलं. “जर मी त्या सिनेमाची निर्मिती करत असेल तर सर्वकाही योग्य पद्धतीने दाखवलं जाईल याची खात्री करून घेईल.”
दरम्यान, गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हे दिग्गज अभिनेते होते. त्यांनी अभिनयाने एक काळ गाजवला होता. १४ जुलै २०२३ रोजी त्यांचं निधन झालं. मावळ तालुक्यात एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत ते आढळले होते. येथे ते एकटेच वास्तव करत होते.
गश्मीरने हिंदी मालिका आणि रिॲलिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. अभिनयाबरोबरच गश्मीर उत्तम डान्सरही आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात रवींद्र आणि गश्मीर महाजनी एकत्रच झळकले होते. देऊळ बंदमध्ये देखील ते एकत्र दिसले होते.