“श्रीकांत शिंदेंना तिकीट मिळालं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईन” ; शिंदे गटाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याची घोषणा

Ramdas Kadam on Srikant Shinde । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तीन जागावर गोंधळ निर्माण झालाय. यामध्ये कल्याण लोकसभेचाही समावेश आहे. याठिकाणी मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. परंतु, त्यांना आता भाजपकडून विरोध होतोय. दुसऱ्या बाजूला या गोंधळामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या महायुतीतल्या स्थानाबद्दल, अधिकारांवर सवाल उपस्थित केले जातायेत.
शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाऱ्या नंतर भाजपच्या विरोधानंतर रद्द करण्यात येतात. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या़बाबतीत घडेल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल, अशी टिप्पणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि खासदार विनायक राऊत यांनीदेखील केलं आहे.
तर मी राजकारणातून निवृत्त होईन Ramdas Kadam on Srikant Shinde ।
ठाकरे गटाच्या या टीकेला शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे. रामदास कदम म्हणाले, माझ्या मनात खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल आदर आहे. मी त्यांना एकच गोष्ट सांगतो की मी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. आमच्यात दोन तास चर्चा झाली. तेव्हा त्यांनी सांगितलं की जागावाटपात किवा तिकीटवाटपात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट मिळण्यात तर मुळीच अडचण नाही. मी मुद्दाम सांगतो की एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट मिळालं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईन.
वरुण सरदेसाईंची शिंदे गटावर टीका Ramdas Kadam on Srikant Shinde ।
ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांना प्रश्न विचारण्यात आला की, ”श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी का जाहीर केली जात नाही?” त्यावर सरदेसाई म्हणाले, हे त्यांच्या पक्षालाच विचारावं लागेल. परंतु, एकंदरित परिस्थिती पाहता शिंदे गटातील खासदारांची उमेदवारीसाठी नावं जाहीर होऊनही नंतर त्यांच्या उमेदवाऱ्या रद्द केल्या जात आहेत. ज्या खासदारांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वेक्षणातून पुढे आली असेल, त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली जात नाहीये.





